केरळमध्ये CPM कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, आठवड्याभरापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांसोबत झाली होती झटापट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kerala-police

केरळमधील कन्नूर जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीएम) कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सोमवारीही माहिती दिली. व्यवसायाने मच्छीमार असलेल्या हरिदासन यांच्यावर रविवारी दुपारी दीडच्या सुमारास न्यू माहेजवळील पुन्नोल येथील त्यांच्या घरासमोर हल्लेखोरांनी हल्ला केला. ते कामावरून परतत होते.

पोलिसांनी सांगितले की, 54 वर्षीय हिरदासन यांना शेजारच्या तलासेरी येथील रुग्णालयात नेण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितले की, मृतदेह परियाराम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, भाजप आणि सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये एक आठवड्यापूर्वी पुन्नोल भागात हाणामारी झाली होती. सीपीएमने आपल्या कार्यकर्त्याची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपच्या लोकांनी केल्याचा आरोप केला आहे. मात्र, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सीपीआय(एम) ने आरोप केला की हरिदासन यांच्यावर “आरएसएस कार्यकर्त्यांनी निर्दयीपणे हल्ला केला आणि धारदार शस्त्रांनी अनेक वेळा हल्ला केला आणि त्याचा एक पायही कापला”. मात्र, आरएसएसने या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या हत्येच्या निषेधार्थ सीपीआय(एम) ने सोमवारी तलासेरी नगरपालिका आणि नवीन माहे पंचायतमध्ये बंद पुकारला आहे.