मग मोदींनाही रिटायर करणार काय? अरुण लाल यांचा सवाल

986

कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. मोदी 69 वर्षांचे आहेत, म्हणून त्यांना राजीनामा देण्यास सांगणार का? असा सवाल माजी क्रिकेटवीर अरुण लाल यांनी हिंदुस्थानच्या क्रिकेट बोर्डाला केला आहे.

कर्करोगातून बरे झालेले बंगालचे क्रिकेट प्रशिक्षक यांचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्याने त्यांना सराव शिबिरांमध्ये सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. ज्यांची वय जास्त आहे आणि रोगप्रतिकार शक्ती कमी अशांना कोवीड संदर्भात केंद्र सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत सराव शिबिरांत भाग घेता येणार नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

या निर्णयाबाबत अरुण लाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना संदर्भात ज्या काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, त्याचा अर्थ असा नाही स्वतःला खोलीत बंद करून घ्यावे. मोदींचे उदाहरण देत अरुण लाल यांनी, पंतप्रधान या वयातही देश कसा चालवत आहेत, त्यांच वय अधिक झालं म्हणून त्यांना कोणी राजीनामा देण्यास सांगणार का? असा प्रश्न केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या