#INDvSA – दक्षिण आफ्रिका संघ 431 धावांवर ऑल आऊट;  हिंदुस्थानाला 71 धावांची आघाडी

690
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हिंदुस्थानी संघाने चौथ्या दिवशी 431धावांवर संपूर्ण दक्षिण आफ्रिकी संघाला बाद केले आहे. यासोबतच हिंदुस्थानी संघाला पहिल्या टेस्टमध्ये 71 धावांची आघाडी मिळाली आहे. सेनुरान मुथुसामी याने अखेरच्या काही क्षणात मोठे शॉट्स खेळले आणि धावांचे अंतर कमी केले. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी सलामीवीर डीन एल्गार (160) व क्विण्टॉन डी कॉक (111) यांनी झुंजार शतके ठोकून दक्षिण आफ्रिकेला संकटातून बाहेर काढले. मात्र या दोघांना बाद करून ‘टीम इंडिया’ने पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात पुनरागमन करण्यात यश मिळवले.
तत्पूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात 7 विकेट गमावून 502 धावांवर डाव घोषित केला. हिंदुस्थानकडून मयंक अग्रवालने 215 धावा केल्या. याशिवाय रोहित शर्मानेही 176 धावांचा डाव खेळला. मयंकने आपल्या डावात 371 चेंडूंचा सामना केला तर रोहितने 244 चेंडूंचा सामना केला. दोघांनीही आपल्या डावात 23-23 चौकार आणि 6 षटकार ठोकले. मयंक अग्रवालने कसोटी कारकीर्दीतील पहिले दुहेरी शतक झळकावले.
दरम्यान, आफ्रिकेच्या पहिल्या डावात अश्विनने 7 गडी बाद केले, जडेजाने 2 आणि इशांत शर्मा याला 1 विकेट मिळाली. अन्य कोणताही गोलंदाज यश मिळवू शकले नाही.
आपली प्रतिक्रिया द्या