विश्वचषक सामन्यात तुझं विराटशी काय बोलणं झालं? बाबर म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने हिंदुस्थानचा 10 विकेटने पराभव केला होता. कोणत्याही विश्वचषक सामन्यात टीम इंडियाचा पराभव करण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ होती. या सामानाच्या समाप्तीनंतर एका विलक्षण क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. तो क्षण म्हणजे सामना समाप्तीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हिंदुस्थानचा त्यावेळी असलेला कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जवळ येऊन त्याच्या कानात काहीतरी म्हणाला होता. त्यावेळी त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, आता याचेच उत्तर बाबर याने दिले आहे.

पाकिस्तानमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विश्वचषकात हिंदुस्थान-पाकिस्तान (India vs Pakistan) सामान्य दरम्यान तुझं आणि कोहलीचं काय बोलणं झालं होत, असा प्रश्न बाबर आझम याला विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना बाबर आझम म्हणाला आहे की, ”आमच्यात जे काही बोलणं झालं, ते मी सर्वांसोमर उघड करणार नाही.” यावेळी पत्रकारांनी त्याला विराट कोहलीला नुकतेच दोन फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे, यावर तुझं काय मत आहे. असा प्रश्न विचारला होता. मात्र यावर पाकिस्तान टीमच्या मॅनेजरने त्याला उत्तर देण्यापासून रोकले आणि म्हणाले की, ही पत्रकार परिषद वेस्ट इंडिज क्रिकेट टीमसोबत होणाऱ्या मालिकेबद्दल आहे, कृपया याशी संबंधितच प्रश्न विचारावे.

दरम्यान, टी-20 विश्वचषक 2021 (t 20 world cup 2021) मध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. तर पाकिस्तानसाठी विश्वचषक खूपच चांगला गेला. या विश्वचषकात हिंदुस्थानचा पहिलाच सामना पाकिस्तानसोबत होता. ज्यात हिंदुस्थानला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच या विश्वचषकात टीम इंडिया सेमीफायनलमध्येही पोहोचू शकली नाही आणि सुपर-12 फेरीतूनच बाहेर पडली. तर पाकिस्तानी टीमने सेमीफायनलमध्ये आपली जागा बनवली. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला.

टी-20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाने 151/7 स्कोर केला होता. तर पाकिस्तानने 10 गडी राखून 152 धावा करत विजय मिळवला होता. या सामन्यात पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने 68 धावा, तर फलंदाज मोहम्मद रिझवान याने 79 धावा केल्या होत्या.