19 वर्षे गुंगारा देणारा कालुसिंग राजस्थानात सापडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

तब्बल 19 वर्षांपूर्वी एका गुह्यात अटक होऊन जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने मुंबईतून धूम ठोकली. तो न्यायालयात एकाही तारखेला हजर राहिला नाही. तेव्हापासून तो फरार होता. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट-6 ने त्याला राजस्थानातून शोधून आणला. कालुसिंग देवीसिंग राजपूत (40) असे त्या आरोपीचे नाव आहे. वर्ष 2007 मध्ये एका गुह्यात त्याला अटक झाली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो मुंबईतून सटकला. त्यानंतर तो न्यायालयात एकाही तारखेला हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला प्रोक्लेम्ड गुन्हेगार म्हणून घोषित केला होता. गुन्हे शाखेचे युनिट-6 च्या पथकाने कालुसिंगचा नव्याने शोध सुरू केला. तो मध्य प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळताच पथक तेथे रवाना झाले. पण आरोपीचा फोटो किंवा राहता पत्ता माहीत नसल्याने त्याला शोधणे कठीण झाले होते. तरीही हार न मानता पथकाने मानवी कौशल्याच्या आधारे माहिती काढली असता तो राजस्थानच्या चित्तोडगढ येथे ऍम्ब्युलन्स चालकाचे काम करत असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने त्याच्या घरावर पाळत ठेवून 19 वर्षांपासून फरार असलेल्या कालुसिंगला पकडून आणले.