अभिलेख सहाय्यकास लाच घेताना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराच्या कंपाऊंडमध्ये बोअरवेल घेण्याकरिता केलेला अर्ज मंजूर झाल्यानंतर मंजूर फाईलवर अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन पुर्तता करण्याकरिता पाच हजाराची लाच मागून तडजोडी अंती साडेचार हजार रुपये घेताना पालिकेच्या नियोजन व संशोधन विभागाचे नियोजन सहाय्यक देविदास कोळी (57) यांना अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

अमरिश (नाव बदलेले) यांना घराच्या पंपाऊंडमध्ये बोअरवेल घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी पालिकेच्या सांताक्रुझ येथील कार्यालयात अर्ज केला होता. तो अर्ज पुढील कार्यवाही करिता पालिकेच्या बी वॉर्ड येथील नियोजन व संशोधन विभागात पाठविण्यात आला होता. त्यानंतर सदर अर्ज व मंजूर फाईलवर अधिकाऱ्यांच्या सह्या घेवून पुर्तता करण्याकरिता देविदास काळे यांनी स्वतःहून अमरिश यांना फोन करून भेटावयास बोलावले. त्यानुसार अमरिश यांनी भेट घेतली असता देविदास यांनी काम करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर पून्हा देविदास यांनी संपर्क करून फाईल तयार असल्याचे सांगत मंगळवारी लाचेची रक्कम घेऊन बोलावले. मात्र लाच द्यायची नसल्याने अमरिश यांनी अॅण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अमरिश यांना तडजोडीअंती ठरलेले साडेचार हजारची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.