
एका प्रसिद्ध विकासकाच्या मुलाला ब्लॅकमेल करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्या मुलाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून त्याची बदनामी केली. याप्रकरणी जुहू पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित मुलाला इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. त्याने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्या महिलेने त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केली. चॅटिंगदरम्यान महिलेने त्याला व्हिडीओ कॉल केला आणि अश्लील कृत्य करायला सुरुवात केली.
काही वेळाने मुलाच्या मोबाईलवर एक व्हिडीओ आला. त्या व्हिडीओमध्ये काही संभाषण एडिट करून पाठवलेले होते. तो व्हिडीओ डिलीट करण्यासाठी 70 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी दिली. त्या मेसेजच्या खाली एका ई-वॉलेटचा नंबर होता. त्या ई-वॉलेटवर खंडणीचे पैसे पाठवण्यास सांगितले. घडल्याप्रकरणी तरुणाने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.



























































