
दर्ग्याच्या मालकी हक्काच्या वादातून शाकीर अली शेखची हत्या झाली होती. शेखच्या हत्येप्रकरणी एका महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक केली. परवीन जाकीर अली शेख असे तिचे नाव आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालगृहात केली आहे.
अफजल अली हा त्याच्या कुटुंबीयांसोबत वांद्रे येथे राहतो. त्याच परिसरात राहणाऱ्या इम्रानसह इतर आरोपीचा दर्ग्याच्या मालकीविरुद्ध वाद सुरू होता. 11 एप्रिलला दर्ग्याच्या मालकी हक्कावरून वाद झाला. त्यानंतर अफजलचे चुलतभाऊ शाकीर अलीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. चौघांनी केलेल्या मारहाणीत शाकीर अली हे जखमी झाले. अफजलने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी चौघांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुह्यात परवीनचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी परवीनला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची रवानगी बालगृहात केली.