फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला या दोषी आढळल्याने गृह विभागाच्या आदेशानुसार पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याकिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीकर असून सीआरपीएफ हैदराबाद येथे अतिरिक्त महासंचालकपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे व अन्य काही लोकांचे बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. 2021मधील पाकसाळी अधिवेशनात ‘फोन टॅपिंग’बाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली होती.

या समितीला राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले आहेत किंवा कसे? याचा   तपास करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार या समितीने पडताळणी करून आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. त्यात रश्मी शुक्ला यांच्या काळात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार टेलिग्राफ ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत सायबर पोलिसांकडून याआधी एक गुन्हा दाखल

रश्मी शुक्ला यांच्याकर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून ऑफिशिअल सिक्रेट ऍक्टअंतर्गत बीकेसी पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शुक्ला यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती.

प्रकरण काय?

  • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांना पाठवलेला गोपनीय अहवाल मार्च 2021मध्ये समाजमाध्यमांवर व्हायरला झाला होता.
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्ला यांच्या अहवालातील अधिकचा तपशील उघड करत त्याआधारे पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.
  • यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गोपनीय अहवालातील माहिती रश्मी शुक्ला यांनीच फोडल्याचा व फडणवीस यांना पुरवल्याचा आरोप केला होता.
  • विधिमंडळाच्या अधिवेशनातदेखील राजकीय नेते व लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केले गेल्याचे आरोप-प्रत्यारोप झाले होते.