सीआरपीएफ बटालियनमधील आणखी 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, दिवसभरात एकूण 10

225

गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन मधील 3, धानोरा येथील 1 व सिरोंचा येथील 1 असे 5 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. सकाळी 5 व आता 5 असे एकूण आज 10 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 55 झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 64 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 120 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या