
मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान शनिवारी लोकल ट्रेनचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर रात्री 12.05 वाजल्यापासून रविवारी पहाटे 5.05 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर रविवारी पाच तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे मेन लाईन व हार्बरच्या प्रवाशांचा ‘विकेंड’चा प्रवास डोकेदुखीचा ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेवर उद्या जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक सकाळी 10ः35 ते दुपारी 3ः35 पर्यंत असेल. ब्लॉक काळात धिम्या मार्गावरील लोकल फेऱया जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच अनेक लोकल फेऱया रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणावर हाल होण्याची शक्यता आहे.




























































