कोठडीतील मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची कुटुंबाची मागणी

318
file photo

विजय सिंग मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीकरिता त्याचे वकील न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत तर दोषी पोलीस अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विजयच्या कुटुंबीयांनी केली. अँटॉप हिल येथे राहणाऱया विजयचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कोठडी मृत्यूप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करून याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.

आज विजयच्या वकिलांनी अंधेरी येथे पत्रकार परिषद घेऊन त्या रात्री नेमके काय घडले याची माहिती विजयच्या भावाने प्रसारमाध्यमांना दिली. आम्हाला न्याय हवाय अशी भूमिका विजयच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या