
ड्रग प्रकरणात कारवाईची भीती दाखवून सायबर ठगाने पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे भायखळा परिसरात राहतात. गेल्या आठवडय़ात त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो कुरिअर कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. त्या पार्सलमध्ये ड्रग, पासपोर्ट असल्याचे भासवले. तुमच्या विरोधात अंधेरी गुन्हे शाखेत गुन्हा नोंद करण्यात आल्याची भीती दाखवली. ही भीती घालवून ठगाने पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.