150 वर्षे जुन्या वास्तूला नवी झळाळी, डी’सिल्वा शाळेच्या ऐतिहासिक सभागृहाचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर पश्चिम येथील डॉ. अँटोनियो डी’सिल्वा शाळेने 150 वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून शाळेच्या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी मिळाली आहे. शिपब्रेकिंग यार्ड लाकूड आणि बर्मा सागवान लाकडाचा वापर करून नूतनीकरण करण्यात आलेल्या डॉ. अँटोनियो डी’सिल्वा सभागृहाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या सभागृहाचे वैशिष्ट म्हणजे 183 जणांच्या बसण्याची क्षमता असलेले हे सभागृह पूर्णतः वातानुकूलित असून फक्त लाकडाचा वापर या सभागृह निर्मितीत करण्यात आला आहे.

डॉ. अँटोनियो डी’सिल्वा ट्रस्टचे आजी-माजी ट्रस्टी आणि शाळेचा माजी विद्यार्थी प्रसिद्ध मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा पार पडला. यावेळी मानद सचिव आणि विश्वस्त रेन्झो रॉड्रिग्ज, संचालक जोसेफ डिसूझा, मुख्याध्यापिका ख्रिस्ताबेल डिसूझा उपस्थित होते.