दादरच्या टिळक पुलाचा स्लॅब कोसळला

652

दादर पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या टिळक पुलाच्या प्लास्टरचा काही भाग आज दुपारी अचानक कोसळल्याने प्रवासी-रहिवाशांमध्ये घबराट पसरली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ही घटना घडताच तातडीने पुलाखालील भाग बंद करून पाहणी करण्यात आली. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून या पुलाची स्ट्रक्चरल ऑडिटरकडून पाहणी करण्यात आली.

दादर पूर्क येथे टिळक पुलाच्या बाजूला असलेल्या पदपथाचा एक मीटर बाय एक मीटर प्लास्टरचा भाग आज दुपारी कोसळला. दुर्घटनेनंतर जी दक्षिण विभागाच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. दादर पश्चिम व पूर्वेला जोडणाऱया या पुलाचा भाग एफ उत्तर विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे एफ उत्तर विभागातील अधिकाऱयांनी त्या ठिकाणी पाहणी करून पुलाखालील भाग बॅरिकेडस् लावून ये-जा बंद केली. तसेच दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. पूल विभागाच्या अधिकाऱयांनीही स्ट्रक्चरल ऑडिटरला बोलवून पुलाच्या सुरक्षेची खात्री करून घेतली. त्यानंतर या पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली. दरम्यान, संबंधित पुलाची आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

टिळक पुलाची दुरुस्ती रखडली

2018 मध्ये अंधेरी येथील गोखले पूल कोसळल्यानंतर मुंबईतील सर्क पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीकर आला. 14 मार्च रोजी छत्रपती शिकाजी टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यानुसार अतिधोकादायक ठरलेले पूल पाडण्यात येत आहेत. तर दुरुस्ती सुचवलेल्या पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दादरच्या टिळक पुलाची दुरुस्ती सुचवण्यात आली आहे. सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी अनेक वेळा स्थायी समितीसह महासभेतही मुद्दा उपस्थित केला, मात्र या पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

  • 1923 मध्ये बांधण्यात आलेला लोकमान्य टिळक पूल दादर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे.
  • किंग्सवे रोडला जोडण्यात आलेला हा पूल स्थानिकांमध्ये किंग्सवे पूल म्हणून ओळखला जायचा.
  • कालांतराने या रस्त्याचे नामकरण आंबेडकर रोड म्हणून झाले. दादर पूर्व (खोदादाद सर्कल) ते दादर पश्चिमला जोडणारा हा प्रमुख पूल आहे.
आपली प्रतिक्रिया द्या