
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान. कोविडचे निर्बंध असल्याने, मनात इच्छा असूनही अनेक भक्तांना दर्शन घेता येत नाही. पण समस्त गणेशभक्तांसाठी आजच एक खूशखबर आहे. भक्तांच्या भावना लक्षात घेऊन संस्थेतर्फे एक आगळीवेगळी कल्पना राबवली गेली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज श्रीमंत दगडूशेठ गणपती अवतणार आहेत थेट आपल्या घरामध्ये.
अंगारकी चतुर्थीला मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास केली जाते. आजवर, ही आरास काचेतूनच पहायला मिळायची. मॅटरपोर्ट या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता गाभाऱ्यातील आरास थेट पाहता येईल. इतकंच नाही, तर विविध बाजूंनी मूर्ती आरास बघताना, आपण थेट गाभा-यातच आहोत, असं वाटेल. भक्ती आणि तंत्रज्ञानाच्या मिलनातून येणारा हा अनुभव घेण्यासाठी इथे क्लिक करा !

























































