अंधेरी-दहिसर-डी. एन. नगर मेट्रो जूनमध्ये ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम उपनगरातील मेट्रो प्रकल्पांचे काम 70 टक्के पूर्ण झाले असून येत्या जूनमध्ये अंधेरी-दहिसर-डी. एन. नगर मेट्रो रेल्वे ट्रॅकवर येणार आहे. जून 2020 मध्ये या मेट्रो मार्गावर गाडय़ा धावू लागतील असा विश्वास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) व्यक्त केला आहे.

अंधेरी ते दहिसर मेट्रो-7 प्रकल्पाचे काम 68 टक्के पूर्ण झाले आहे तर दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 अ प्रकल्पाचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हे दोन्ही मार्ग सुरू होणार होते, पण बांधकामात काही अडचणींमुळे थोडा विलंब झाल्याने पुढील वर्षी हे मार्ग सुरू होतील, असे एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या मार्गांवरील गाडय़ांसाठी नोव्हेंबर 2018 मध्येच ऑर्डर देण्यात आली. त्यातील पहिली गाडी दाखल व्हायला 18 महिने लागले. दोन्ही मार्गांवर काही ठिकाणी गर्डर्स चढवण्याचे काम बाकी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.