
दहिसर येथे पुरुषाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. बाळासाहेब दत्ता असे मृताचे नाव आहे. दहिसर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
बाळासाहेब हे पत्नी आणि दोन मुलांसोबत दहिसरच्या अंबावाडी येथे राहत होते. त्यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. आज दुपारी बाळासाहेब हे एकटेच घरी होते तेव्हा त्याने गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी त्यांची पत्नी घरी आली. तिने दरवाजाची बेल वाजवली, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. महिलेने याची माहिती शेजारील रहिवाशांना दिली. रहिवाशांनी याची माहिती दहिसर पोलिसांना दिली.
पोलिसांनी दरवाजा तोडून आत आले तेव्हा बाळासाहेबने गळफास लावून आत्महत्या केली होती. पोलिसांनी त्याला उपचारासाठी एका रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून बाळासाहेबला मृत घोषित केले.





























































