Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 30 नोव्हेंबरचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

मेष ( ARIES – Tuesday, November 30, 2021)
आजचा दिवसात आरामत घालवाल. कोणतेही नवे काम हाती घेण्यापूर्वी त्याबाबत संपूर्ण माहिती मिळवा. आज संध्याकाळी जोडीदारासोबत वेळ घालवाल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे आजचा दिवस निवांत, आरामात आणि आनंदात जाईल.

भाग्य रंग – हिरवा

वृषभ – (TAURUS – Tuseday, November 30, 2021)
मिळालेला मोकळा वेळ कुटुंबियांच्या सोबत घालवाल. काही महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत घरच्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा आदर करा. आज केलेली पैशाची बचत उद्या महत्त्वाच्या कामाकरिता उपयोगी पडेल. आज संपूर्ण दिवस उत्साहात घालवाल.

भाग्य रंग – राखाडी

मिथुन – ( GEMINI Tuesday, November 30, 2021)
स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. आजी-आजोबांना वेळ द्या. मौनं सर्वार्थ साधनम्, हे लक्षात ठेवा. प्रेमप्रकरणात यशस्वी होण्याची शक्यता आहे. एकांतात राहावे असे वाटू लागेल. हिरव्या रंगाच्या गोड पदार्थाचा आहारात समावेश करा.

भाग्य रंग – चंदेरी

कर्क – (CANCER Tuesday, November 30, 2021)
एखादी गोड आठवण तुमच्या नात्यातील दुरावा दूर करेल. जुन्या कटू आठवणी बाजूला सारून सकारात्मक प्रसंगांची मनाची जाणीव करून द्या. दूध, साखर, पांढरा गुलाब एखाद्या धार्मिक ठिकाणी वाहा. धनलाभाची शक्यता आहे.

भाग्य रंग – फिकट पिवळा

सिंह – ( LEO Tuesday, November 30, 2021)

मानसिक शांततेसाठी छंद जोपासा. आवडते संगीत ऐका, छान छान पुस्तके वाचा. मनावर बुद्धिने ताबा ठेवायला शिका. कष्टामुळे आपल्या कामाचे चिज होईल. जोडीदाराकडून प्रोत्साहन मिळेल.

भाग्य रंग – मोरपिसी

कन्या (VIRGO Tuesday, November 30, 2021)

कामाच्या ठिकाणी जबाबदारीत वाढ होण्याचे प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. वरिष्ठांशी वेगळ्या प्रोजेक्टबद्दल चर्चा कराल. नवीन पुस्तक खरेदी करा. आर्थिक व्यवहार करताना एखाद्यावर पूर्णपणे विसंबून राहू नका.

भाग्य रंग – जांभळा

तूळ ( LIBRA Tuesday, November 30, 2021)

मौल्यवान वस्तू जपा. मोबाईलमध्ये अनावश्यक बघण्यात वेळ जात नाही ना याकडे लक्ष द्या. भुकेलेल्याला यथाशक्ती अन्नदान करा. आत्मविश्वास वाढवणरे प्रसंग घड्याची शक्यता आहे.
भाग्य रंग – आकाशी

वृश्चिक ( SCORPIO Tuesday, November 30, 2021)
प्रिय व्यक्तीला समजून घ्या. पैसे खर्च करताना सतर्क राहा. दगदग कमी होईल. योग्य त्या ठिकाणी नेतृत्त्व पार पाडण्याची जाबाबदारी घ्यावी लागेल. नव्या कल्पना सुचतील.
भाग्य रंग – पांढरा

धनू ( SAGITTARIUS Tuesday, November 30, 2021)

नातेवाईकाच्या घरी जाण्याचा योग आहे. आरोग्याची काळजी घ्या. दुसऱ्यांना बोलताना विचार करून बोला. धार्मिक कार्याकरिता खर्च करा. रागावर नियंत्रण मिळवा. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने सर्व प्रश्न सुटून जातील.

भाग्य रंग – काळा

मकर ( CAPRICORN Tuesday, November 30, 2021)
थोरांचे आशीर्वाद लाभतील. मनाजोगते, आवडीचे काम हाती घेण्याची संधी मिळेल. स्वत:साठी वेळ द्याल. आवडत्या व्यक्तिची भेट होण्याची शक्याता आहे. गणपतीच्या देवळात जाऊन प्रदक्षिणा घाला.

भाग्य रंग – मोती

कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Tuesday, November 30, 2021)
पैसे अनावश्यक खर्च करू नका. जुन्या मित्राची अचानक भेट होईल त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. नोकरीत वरिष्ठ सहकार्य करतील. पैशाची बचत करण्याची सवय लावा.

भाग्य रंग – क्रिम

मीन (PISCES Tuesday, November 30, 2021)
रात्री पाण्यात बदाम भिजत ठेवा आणि सकाळी खा. अनावश्यक विचार करू नका. आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आवडीचा पदार्थ खायला मिळेल. मनाजोगत्या घटना घडल्यामुळे दिवस आनंदात जाईल.

भाग्य रंग – निळा