
मेष (ARIES – Tuesday, April 19, 2022)
जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. सहनशिलता ठेवून कामे करावी लागतील. इतरांवर अवलंबून राहू नका. आर्थिक अडचणी येण्याआधीच पैशाचे नियोजन करा. जोडीदाराकडून अपेक्षा ठेवू नका. स्वत:साठी वेळ काढाल.
शुभरंग : चॉकलेटी
वृषभ (TAURUS – Tuesday, April 19, 2022)
सामाजिक माध्यमांचा स्वत:च्या कामासाठी वापर कराल. जोडीदाराचा सल्ला घ्याल. आध्यात्मिक क्षेत्रात मन गुंतवाल. सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात ठेवा. कामावर सहकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल. कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या फायद्या-तोट्याचाही विचार कराल.
शुभरंग : पांढरा
मिथुन (GEMINI – Tuesday, April 19, 2022)
स्वास्थ्य जपा. नोकरी-व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. मनाजोग्या गोष्टी घडतील. भावंडांसोबत वेळ घालवाल. आजचा दिवस सुखदायक आहे. सकाळची वेळ व्यायाम, योगासन यासाठी द्याल. आज घेतलेल्या मेहनतीचं फळ भविष्यात नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा.
शुभरंग : पोपटी
कर्क (CANCER – Tuesday, April 19, 2022)
कोणावरही विसंबून राहू नका. घरगुती वातावरण आनंदी असेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आजचा दिवस आपल्यासाठी गोड बातमी देणारा आहे. आवडता पोषाख परिधान करा. गुंतवणुकीचे व्यवहार करण्याचा विचार कराल. कुटुंबियांसोबत करमणुकीचे कार्यक्रम पाहा.
शुभरंग : केशरी
सिंह (LEO – Tuesday, April 19, 2022)
कार्यक्रमातून आनंद मिळेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तिंच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्याची तक्रारी दूर होण्याचा काळ आहे. घरातील मौल्यवान वस्तू काळजीपूर्वक हाताळा. घरात चाफ्याचे अत्तर शिंपडा.
शुभरंग: अबोली
कन्या (VIRGO – Tuesday, April 19, 2022)
आजचा दिवस मजेत घालवाल. घरातील वातावरण हसतेखेळते असेल. मनासारखे यश मिळेल. कामात व्यस्त राहाल. घरी शुभकार्य घडण्याची शक्यता आहे. तुळशीला दररोज सकाळी घाला. आरोग्याची काळजी घ्याल. प्रिय व्यक्तिसाठी आज वेळ काढाल.
शुभरंग : मोरपिसी
तूळ (TULA- Tuesday, April 19, 2022)
आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायक आहे. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सौंदर्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्याल. कोणाच्याही भावना दुखवू नका.
शुभरंग : राखाडी
वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, April 19, 2022)
वरिष्ठाचा सल्ला ऐकाल. व्यवहार जपून करा. कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्याल. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. कुटुंबातील ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा लाभ होईल. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे इतरांचे मन जिंकाल. बोलताना मधुरावाणीचा फायदा होईल.
शुभरंग : निळा
धनु (SAGITTARIUS – Tuesday, April 19, 2022)
प्रयत्न करत राहा. स्वत:च्याच कामात लक्ष घालाल. कामात सहकारी मदत करतील. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक थकवा दूर करण्याठी ध्यानधारणा कराल. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. समाजकार्यात लक्ष घालाल.
शुभरंग : मोती
मकर ( CAPRICORN – Tuesday, April 19, 2022)
घरातील ज्येष्ठांची काळजी घ्याल. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा माराल. ब्यूटिपार्लरमध्ये जायला वेळ मिळेल. नव्या कला शिकण्यासाठी वेळ काढाल. आवडत्या गोष्टीत मन रमवाल.
शुभरंग : जांभळा
कुंभ (AQUARIUS – Tuesday, April 19, 2022)
मनावर कोणतेही दडपण ठेवू नका. घरगुती वातावरण चांगले असेल. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावू नका. मित्र गरजेला मदत करतील. आरोग्याची काळजी घ्याल. पथ्यपाणी सांभाळा. जुने विसरून नव्या गोष्टी करण्याचा विचार करा.
शुभरंग : गुलाबी
मीन (PISCES – Tuesday, April 19, 2022)
डोळ्यांची काळजी घ्याल. शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा. मंदिरात जाऊन तिथल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा करून घ्याल. कोणाविषयीही गैरसमज करून घेऊ नका.
शुभरंग : काळा

























































