
मेष (ARIES – Saturday, February 26, 2022)
हातात पैसा खेळता राहिल. घरगुती अडचणींवर मात कराल. आरोग्याचे संतुलन बिघडू देऊ नका. वादविवादापासून लांब राहा. नकारात्मकतेपासून दूर राहा. जोडीदाराच्या बाबतीतले निर्णय घाईघाईने घेऊ नका. सरकारी नियम पाळावे लागतील.
शुभरंग : मोरपिसी
वृषभ (TAURUS – Saturday, February 26, 2022)
योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतील. संकट आलं तरी आत्मविश्वासाने काम करत राहा. कामात नवीन आव्हाने स्वीकारा. हातात घेतलेली कामे सफल होतील. तब्येतीची काळजी घ्या. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. कोणालाही उधार देऊ नका.
शुभरंग: केशरी
मिथुन (GEMINI – Saturday, February 26, 2022)
कामांत काही वेळा गुप्तता पाळणे हिताचे असते. नोकरीत सावध राहा. कार्यालयातील इतर लोकांबरोबर शांतपणे वागण्याचा प्रयत्न करा. आपल्या बोलण्याचा इतरांव प्रभाव पाडाल. वेळ वाया घालवू नका. दगदगीची कामे करू नका. प्रिय व्यक्तिची भेट होईल.
शुभरंग: हिरवा
कर्क (CANCER – Saturday, February 26, 2022)
घरात शुभकार्य घडेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. लोकांनी निंदा केली तरी निंदकाचे घर असावे शेजारी, ही म्हण लक्षात ठेवून वागा. कुटुंबियांना वेळ द्याल. आहारविहाराबाबत काळजी घ्या. महत्त्वाची कामे पूर्ण कराल. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय तुमची प्रतिक्रिया व्यक्त करू नका.
शुभरंग: लाल
सिंह (LEO -Saturday, February 26, 2022)
स्वत:साठी वेळ काढाल. आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक आहे. आवडते झाडाचे रोपटे घरच्या अंगणात लावा. धार्मिक कार्यात भाग घ्याल. आर्थिक लाभ होईल. मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकाल. नवीन आव्हाने स्वीकाराला.
शुभरंग: राखाडी
कन्या (VIRGO – Saturday, February 26, 2022)
वरिष्ठ खूश होतील. भूतकाळाचा विचार करू नका. कार्यालयात स्नेहभाव वाढवा. ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. कुटुंबात सुसंवाद साधाल. गुंतवणूक काळजीपूर्वक कराल. जुन्या ओळखीचा फायदा करून घ्याल. छंदा जोपासा वेळ मजेत जाईल.
शुभरंग: जांभळा
तूळ (LIBRA – Saturday, February 26, 2022)
दुसऱ्याच्या भांडणात पडू नका. इतरांच्या चुकांतूनही तुम्हाला शिकायला मिळेल. जिद्द धरा हट्टीपणा नको. घरातील ज्येष्ठ व्यक्तिंचा आदर कराल. कोणावरही अवलंबून राहू नका.
शुभरंग: आकाशी
वृश्चिक ( SCORPIO – Saturday, February 26, 2022)
कोणालाही पैसे उधार देऊ नका. प्रिय व्यक्तिची भेट घ्याल. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याची काळजी घ्याल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. जोडीदारासोबत प्रेमाने वागा.
शुभरंग: पांढरा
धनु (SAGITTARIUS – Saturday, February 26, 2022)
घरात शांतता राखा. मनाजोग्या खरेदीचा आनंद घ्याल. सकाळचा वेळ व्यायाम करणे, झाडांना पाणी घालणे, ध्यानधारणा अशी कामे करण्यासाठी वापरा. प्रिय व्यक्तिच्या सान्निध्यात राहाल. हितचिंतकाचे मतही विचारात घ्यावे लागेल.
शुभरंग: खाकी
मकर ( CAPRICORN – Saturday, February 26, 2022)
जोडीदारासोबत झालेले भांडण तडजोडीने मिटवा. घाईगडबड करणे टाळा. इतरांची अतिचिकित्सा टाळा. प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. रोगप्रतिकारशक्ती वाढेल. कलागुण दाखवण्याची संधी मिळेल. नातेवाईकांसोबत आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा.
शुभरंग: सोनेरी
कुंभ (AQUARIUS – Saturday, February 26, 2022)
प्रवासात करताना सावधानता बाळगा. प्रसिद्धिच्या लोभात पडू नका. कामाचे योग्य पद्धतीने नियोजन कराल. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. विरोधकांचा विरोध मावळेल. प्रिय व्यक्तिला त्याच्या आवडीची भेटवस्तू द्या.
शुभरंग : नारिंगी
मीन (PISCES – Saturday, February 26, 2022)
एखादा चांगला शेजारी जोडून ठेवा. गर्दीच्या ठिकाणापासून दूर राहा. शत्रूचा जोर कमी होईल. मोहाला बळी पडू नका. आजचा दिवस शुभदायक आहे. टोकाची भूमिका घेणे टाळा. प्रवासात चालताना काळजी घ्या. जबाबदारी टाळू नका.
शुभरंग: तांबडा































































