
मेष (ARIES – Wednesday, March 30, 2022)
घरात पाळलेल्या पाळीव प्राण्याची काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. आराम करण्यासाठी वेळ काढाल. आजचा दिवस चांगला आहे.
शुभरंग : नारिंगी
वृषभ (TAURUS – Wednesday, March 30, 2022)
इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी मार्गदर्शन घ्या. आजचा वेळ आवडीची कामे करण्यात घालवाल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा. प्रिय व्यक्तिला त्याच्या आवडीची वस्तू भेट म्हणून द्या.
शुभरंग : केशरी
मिथुन (GEMINI – Wednesday, March 30, 2022)
लाल रंगाचा पोषाख परिधान करा. आज मेहनत केलीत तर उद्या यश मिळेल. स्वत:साठी वेळ काढाल. अपेक्षित फळासाठी मेहनत घ्यावी लागेल. जोडीदारासोबत आजचा दिवस घालवाल. सकाळचा वेळ स्वत:साठी द्याल.
शुभरंग : हिरवा
कर्क (CANCER – Wednesday, March 30, 2022)
जेवणात मधाचा वापर करा प्रेम संबंधात गोडवा येईल. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवा. कामाकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा आजचा दिवस आहे. जोडीदारासोबत सायंकाळी फिरायला जाल.
शुभरंग : काळा
सिंह (LEO – Wednesday, March 30, 2022)
स्पर्धांमध्ये भाग घ्याल. आर्थिक लाभाची संधी मिळेल. कुणाशीही अनावश्यक भांडण करू नका. कोणालाही कसलेही वचन देऊ नका. रागावर नियंत्रण मिळवावे लागेल. नाती जपा.
शुभरंग: पोपटी
कन्या (VIRGO – Wednesday, March 30, 2022)
आजारपण अंगावर काढू नका. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. घरी दूरचे नातेवाईक येण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींसोबत आजची सायंकाळ घालवाल. सौंदर्यवाढीकरिता मसूर डाळीच्या पिठाचा वापर करा. नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील.
शुभरंग : चॉकलेटी
तूळ (TULA- Wednesday, March 30, 2022)
भुकेलेल्याला कढी-भात खाऊ घाल. आहारात थंड पदार्थांचा समावेश करा. सकाळी व्यायाम करण्याला महत्त्व द्या. आध्यात्मिक कार्यात भाग घ्याल. आजचा दिवस लाभदायक आहे. प्रिय व्यक्तिची वाट पाहण्यात वेळ घालवाल.
शुभरंग : जांभळा
वृश्चिक ( SCORPIO – Wednesday, March 30, 2022)
गाईंना चारा खाऊ घाला. स्वत:विषयी छान वाटेल. एकांतातही आनंदी राहण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या योजना फलद्रुप होतील. जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.
शुभरंग : तांबडा
धनु (SAGITTARIUS – Wednesday, March 30, 2022)
सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. आजचा दिवस आरोग्यदायी आहे. पैशांची स्थिती बरी असेल. ऋतुचर्येचं पालन करा. वसंत ऋतुचा आनंद घ्याल. आहारात कच्च्या कैरीच्या लोणच्याचा समावेश करा. रिकामा वेळ स्वत:साठी वापरा.
शुभरंग : पांढरा
मकर ( CAPRICORN – Wednesday, March 30, 2022)
दयाळू स्वभावामुळे अनेकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल. नोकरीची संधी चालून येण्याची शक्यता आहे. समाजात कौतुक होईल. एकांतात वेळ घालवाल. मंदिरात प्रसाद वाटप करा. क्षुल्लक वाद विसरून जा.
शुभरंग : मोरपिसी
कुंभ (AQUARIUS – Wednesday, March 30, 2022)
घरात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. नातेसंबंध घनिष्ठ होण्यासाठी प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी आज एका छान व्यक्तिशी ओळख होईल. आत्मविश्वास वाढवा. नवीन मित्रमंडळी जोडाल. आजची सायंकाळ नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यतित कराल.
शुभरंग : तांबडा
मीन (PISCES – Wednesday, March 30, 2022)
प्रात:काळी उठून सूर्याचे दर्शन घ्या. 11 वेळा गायत्री मंत्र म्हणा. जोडीदाराला खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. लहान मुलांसोबत मौज मस्ती करण्यासाठी वेळ द्याल. आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे.
शुभरंग : पांढरा
































































