
मेष (ARIES – Friday, March 4, 2022)
भावनेला बळी पडू नका. अयोग्य गोष्टी टाळा. बदल स्वीकारण्याकरिता मनाची तयारी करावी लागेल. अभ्यास छान होईल. कोणालाही उधार देऊ नका. हातातली कामे सफल होतील. कोणाच्याही वैयक्तिक कामात लुडबूड करू नका. तब्येतीची काळजी घ्या.
शुभरंग : पोपटी
वृषभ (TAURUS – (ARIES – Friday, March 4, 2022)
नव्या योजनांना गती मिळेल. आळस झटकून उद्योगाला लागाल. निरर्थक वादविवाद कोणाशीही करू नका. कटुंबापासून थोडं लांब राहावं लागेल. खर्च वाढू शकतो, पण तो योग्य कारणासाठी होईल. ठरवलेली कामे वेळेत पूर्ण कराल.
शुभरंग: काळा
मिथुन (GEMINI – (ARIES – Friday, March 4, 2022)
आर्थिक नियोजन करा. विश्रांती घ्या. आपल्या शांतपणे बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल. स्वास्थ्य जपा. प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीला यश मिळेल. नुकसान होण्यापासून वेळीच सावध राहा. प्रिय व्यक्तीची बऱ्याच दिवसांनी भेटगाठ होईल.
शुभरंग: मोरपिसी
कर्क (CANCER – (ARIES – Friday, March 4, 2022)
शांतता आणि संयम पाळून राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. घरातील मंडळींना वेळ द्याल. त्यांची बाजू समजून घ्याल. खाण्यापिण्याचे पथ्यपाणी सांभाळावे लागेल. आरोग्याची काळजी घ्या. घराबाहेर जाताना थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घ्या.
शुभरंग: खाकी
सिंह (LEO – (ARIES – Friday, March 4, 2022)
नम्रतेचे धोरणही काही वेळा स्वीकारावे लागते. हे लक्षात ठेवा. संयम राखणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. आरोग्याचे संतुलन बिघडू शकते त्याकडे लक्ष द्या. अडचणींवर मात कराल.
शुभरंग: राखाडी
कन्या (VIRGO – (ARIES – Friday, March 4, 2022)
चिंता करू नका. व्यसनाच्या आहारी न जाता कामाकडे लक्ष द्या. उष्णतेचे विकार झाल्यास सब्जा, गुलकंद या पदार्थांचा आहारात समावेश करा. दैनंदिन कामाचे वेळापत्रक बनवा. गोड बोलून कामे साध्य करून घ्या. छंद जोपासा.
शुभरंग: जांभळा
तूळ (LIBRA – (ARIES – Friday, March 4, 2022)
कोणालाही अनावश्यक आश्वासने देऊ नका. विचारांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कौटुंबिक जबाबदारी स्वीकाराल. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. पैसे सुरक्षित जागी ठेवा.
शुभरंग: आकाशी
वृश्चिक ( SCORPIO – (ARIES – Friday, March 4, 2022)
स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडा, प्रलोभनांपासून दूर राहा. शेजाऱ्यांना मदत करू शकाल. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्वत:ला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाव आहे. जोडीदारासोबत प्रेमाने वागा.
शुभरंग: निळा
धनु (SAGITTARIUS – (ARIES – Friday, March 4, 2022)
तुमच्या कामाची लोकं स्तुती करतील. कामावर लक्ष केंद्रित करा. पैसे साठवण्याचं नियोजन करा. अडचणीतून यशाचा मार्ग सापडेल. कंटाळा न करता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा शिकण्याचा प्रयत्न कराल. जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर लक्ष केंद्रित कराल.
शुभरंग: सोनेरी
मकर ( CAPRICORN – (ARIES – Friday, March 4, 2022)
उतावीळपणे निर्णय घेऊ नका. खर्च नियंत्रणात ठेवा. इतरांची अतिचिकित्सा करायला जाऊ नका. कोणावर अवलंबून राहणे टाळा. काही वेळा शांततेसाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. उगाच कोणावर रागवू नका.
शुभरंग: जांभळा
कुंभ (AQUARIUS – (ARIES – Friday, March 4, 2022)
मित्रमंडळींशी संबंध जपावे लागतील. व्यसनी मित्रांपासून लांब राहा. मनात नसताना प्रवास करावे लागतील. कामाचे दीर्घकाळ नियोजन कराल. तारतम्याने निर्णय घ्यावे लागतील.
शुभरंग : पांढरा
मीन (PISCES – (ARIES – Friday, March 4, 2022)
वडीलधाऱ्यांची काळजी घ्याल. मेहनतीने सर्व शक्य होते हे लक्षात ठेवा. जोखमीची कामे काळजीपूर्वक करा. प्रवासात धावपळ होण्याची शक्यता आहे. टोकाची भूमिका घेणे टाळा. उंचावरून चालताना काळजी घ्या.
शुभरंग: चंदेरी




























































