
आयपीएलसाठी मुंबईत आलेला दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने मुंबईचे रस्ते सुपर क्लीन असल्याचे म्हटले आहे. स्वच्छ आणि सुंदर रस्त्यांसाठी मुंबई महापालिका आणि सफाई कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचेही त्याने तोंडभरून कौतुक केले आहे. त्याने यासंदर्भात ट्विटरवर ट्विट करून ‘वेल डन’ अशा शब्दांत प्रशंसा केली आहे. त्याचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.




























































