
बऱ्याच महिला व पुरुषांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात. डोळ्याखालील काळी वर्तुळी घालवायची असतील तर सर्वात आधी दररोज किमान 7 ते 9 तास पुरेसी झोप घ्या. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. आहारात ताजी फळे आणि भाज्या खा. हिरव्या भाज्यांचा समावेश असू द्या.
स्क्रीनसमोर जास्त वेळ काम करणे टाळा. डोळ्यांना अधूनमधून विश्रांती द्या. थंड झालेल्या काकडीचे तुकडे 10 मिनिटांसाठी डोळ्यांवर ठेवा. नंतर तो भाग पाण्याने धुवा. ताज्या लिंबाचा रस किंवा कोरफड जेल काळ्या डागांवर लावा. त्वचेला मॉइश्चराइज करून आणि तिची काळजी घेऊन तुम्ही काळी वर्तुळे कमी करू शकता.



























































