दारूखाना परिसर उजळला! शिवसेनेच्या प्रयत्नांतून 26 नवीन स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या प्रयत्नांतून दारूखाना क्वे स्ट्रीट रोड, ब्रिटानिया व्हिक्टोरिया रोड, दर्गा गल्ली या ठिकाणी नवीन स्ट्रीट लाईट बसवण्यात आले असून नुकतेच त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे.

शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत तसेच शिवसेना उपनेते – आमदार मनोज जामसुतकर यांच्या प्रयत्नांतून दारूखाना परिसरातील २६ स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी मुंबई पोर्ट ट्रस्ट अधिकारी श्रीवास्तव, साने, शाखाप्रमुख निंगाप्पा चलवादी, डिसमा असोसिएशनचे अध्यक्ष भरत कनकिया, उपाध्यक्ष प्रदीप सुरेका, परीन कांतीभाई, सेटिया, सुरेंद्र चौधरी, दिनेश अजमेरा, प्रमोद शेट, राजू शेट, समन्वयक प्रदीप बागवे, उपशाखाप्रमुख सुरेश चलवादी, बाळकृष्ण नावगे, सुब्रमण्यम परार, विजय शेखर, गणेश नायर, कृष्णा, गटप्रमुख महादेव पारसे, प्रभाकर शेट्टी, राम कोतरी, राबिया कोयरी, सबिना शेख, आरती, फरिदा या वेळी उपस्थित होते.