
सामना ऑनलाईन, पुणे
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार असल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज 21 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार आहेत.


























































