डेटिंग अॅप वापरणाऱ्यांनो सावधान! ‘या’ आजारांचा विळखा पडण्याची शक्यता

1585
प्रातिनिधिक फोटो

तरुण, तरुणींना आकर्षित करण्यासाठी सध्या मार्कटमध्ये शेकडो डेटिंग अॅप आहेत. आजची तरुणाई दिवसभर या डेटिंग अॅपला चिकटून असल्याचे दिसते. परंतु तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा असतो तेवढा तोटाही असतो. डेटिंग अॅपवर दिवसभर पडून असणाऱ्या तरुणांवर ‘ओहयो स्टेट यूनिवर्सिटी की कॅथरीन कोडक्टो’ने एक सर्वेक्षण केले. डेटिंग अॅप वापरणाऱ्या 269 तरुणांचा सर्व्हेत समावेश करण्यात आला. यात धक्कादायक गोष्टी समोर आल्या.

सकाळी उठताच मोबाईल हाती घेणाऱ्यांनो सावधान, ‘या’ समस्या उद्भवतात

डेटिंग अॅपवर दिवसभर पडून असणारे तरुण एकटेपणा आणि चिंतेने त्रासून जाण्याची शक्यता जास्त असते. तसेच या लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत अनेकदा नकारात्मक भावनाही जास्त दिसतात.

depressing

सर्व्हेतून असे दिसून आले की जे तरुण डेटिंग अॅपवर असतात ते आपल्या कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी मन लावून काम करू शकत नाही. यामागे सातत्याने फोन चेक करणे हे कारण असल्याचे दिसून आले आहे.

डेटिंग अॅप वापरण्याच्या सवयीमुळे अनेक विद्यार्थी कॉलेज बंक करत असल्याचेही दिसून आले. तसेच काहींचे कामात मन न लागल्याने त्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार दिसून आली.

dating-apps

अनेक तरुण डेटिंग अॅपवर दिवसभर वेड्यासारखे स्वाईप करतानाही आढळून आले. मित्रासोबत फिरताना, जेवताना आणि कॉलेजमध्ये असतानाही तरुण फोन बाहेर काढून चेक करताना दिसले. यामुळे मित्रांमध्ये असतानाही एकटेपणाची भावना त्यांच्यात वाढल्याचे दिसले.

अॅपवर एखाद्या व्यक्तीने बोलण्यास अथवा भेटण्यास नकार दिल्यास तरुणांमध्ये आपल्यात काहीतरी कमी आहे अशी भावना वाढल्याचे दिसले. यामुळे स्वत:बाबत नकारात्मक विचारही त्यांच्या मनात घोळू लागले.

single

सर्व्हेत सहभागी झालेल्या मुलांना डेटिंग अॅपवर काळ कमी करू शकता का असे विचारले असता त्यांनी नाही असे उत्तर दिले. समोरासमोर एखादीची भेट घेताना घबराट होत असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र डेटिंग अॅपवर अनोळखी व्यक्तींशीही तासंतास गप्पा झोडता येतात असेही ते म्हणाले. यामुळे तरुणांमध्ये संवाद कौशल्य आणि आत्मविश्वासाची कमतरता वाढत असल्याचे सिद्ध झाले.

stress

आपली प्रतिक्रिया द्या