वॉर्नरच्या “चिमुरडी’ इंडीला बनायचेय विराट कोहली

981

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर याची कन्या इंडी हिला चक्क हिंदुस्थानी कर्णधार विराट कोहली बनायची इच्छा आहे. स्वतः वॉर्नरने आपल्या छोट्या मुलीचा घरात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत हा गौप्यस्फोट केला आहे. या व्हिडिओत बॅटिंग करणारी गोड इंडी म्हणतेय “मी विराट कोहली आहे”..तशी क्युट कॅप्शनच टाकून वॉर्नरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.


View this post on Instagram

I’m not sure about this one . Indi wants to be @virat.kohli Caption This??

A post shared by David Warner (@davidwarner31) on

सध्या तुफान फॉर्मात असणारा डेविड वॉर्नर आपल्या व्हिडिओत म्हणतोय,माझी बेटी इंडी हिच्याबाबत आतातरी मी निश्चित काही सांगू शकत नाही.तिला हिंदुस्थानी “रनमशीन” विराट कोहली बनायचे आहे. घरात क्रिकेट खेळताना मी विराट कोहली आहे अशी तिची बडबड सतत सुरु असते”.हिंदुस्थानातील आयपील लीगमध्ये लोकप्रिय असलेल्या डेविड वॉर्नरसोबत त्याच्या छोट्या मुलीही क्रिकेट आयपीएलच्या लढती बघायला जातात.तिथेच इंडीने विराट कोहलीची फलंदाजी प्रत्यक्ष पाहीली आणि तिला विराटसारखी धडाकेबाज फलंदाज व्हावे असे वाटायला लागलेय असे वॉर्नर म्हणतो.

आपली प्रतिक्रिया द्या