
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यातच आता कोरोना विरोधातील लढ्यासाठी खूशखबर आली आहे. भारतीय औषध नियामक मंडळाने ( डीसीजीआय) 12 ते 18 वर्षांमधील मुलांना बायोलॉजिकल ई लिमिटेडने बनवलेली Corbevax ही कोरोनावरील लस देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. या लसीचे दोन डोस 28 दिवसांमध्ये घ्यायचे आहेत. या लसीचा साठा 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात केला जातो.
आता 12 ते 18 वर्षांमधील मुलांसाठी कोरोनावरील लसीला अंतिम मंजुरी मिळाल्याने कोरोनाविरोधी लढ्याला अधिक बळ मिळणार आहे. लसीकरण हाच कोरोना महामारी रोखण्यासाठी महत्त्वाचा उपाय असल्याने आता 12 ते 18 वर्षांमधील मुलांसाठी कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाल्याने त्यांचा संक्रमणापासून बचाव होण्ास मदत होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे जनतेने निर्बंध पाळून काळजी घेणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोना महामारीचा धोका अजून टळला नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोनाचे व्हेरिएंट शोधणे कठीण असल्याने ही महामारी रोखण्यासाठी जनतेने योग्य ती काळजी घेण्याची गरज डब्लूएचओने व्यक्त केली आहे.





























































