त्याने सापाचं शीर कापलं.. तरीही सापाने केला दंश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । टेक्सास

अमेरिकेतल्या टेक्सास या शहरामध्ये एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. एका व्यक्तीला कापलेल्या सापाच्या शिरानं डसल्याची घटना घडली आहे. सापाचं विष उतरवण्यासाठी त्या व्यक्तीला औषधाचे २६ डोस देण्यात आले.

जेनिफर सटक्लिफ नावाच्या महिलेने स्थानिक माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, तिचा नवरा बागेत काम करत असताना ४ फूट लांब विषारी साप त्यांनी बघितला. सापाला मारण्यासाठी त्यानं सापाच शीर धडापासून वेगळं केलं. कापलेल्या सापाला फेकायला जाताना, सापाच्या कापलेल्या शीराने त्याला डसलं. सापाच्या मृत्युनंतरही काही तास त्याच शीर जिवंत असतं आणि तो डसू शकतो.

जेनिफरच्या सांगण्यानुसार तिच्या नवऱ्याला सापानं डसल्यानंतर लगेचच विष चढायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांना हवाई मार्गाने रुग्णालयात दाखल केलं. आठवडाभर रुगणालयात राहिल्यानंतर आता त्यांची प्रकृती पूर्वीसारखी ठणठणीत झाली आहे.