सरपण गोळा करायला गेलेल्या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

756

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुराचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहिरगाव येथे घडली. या घटनेमुळे परिसरात वाघाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.

जिल्ह्यातील राजूरा (मध्य) चांदा वनविभागांतर्गत येणाऱ्या विहिरगाव बिटातील सर्व्हे नंबर 336 मध्ये चूनाळा गावातील उद्धव मारोती टेकाम हे सरपण गोळा करायला गेले. सरपण गोळा करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांचे शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. हल्ल्याची ही घटना सकाळी घडली.

आपली प्रतिक्रिया द्या