ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणाला आग; कोरोनाबाधिताचा मृत्यू

देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच काही ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर यासारख्या सुविधांचा अभाव आहे. तर काही रुग्णालयातील निष्काळजीपणा रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. मध्य प्रदेशात घडलेल्या अशाच एका घटनेने कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजन देण्यात येत होते. त्याचवेळी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणाला अचानक आग लागली. उपकरणाला आग लागल्याने कोरोनाबाधित व्यक्तीच्या मुलाने ऑक्सिजन पुरवठा करणारी नळी हटवली. त्यानंतर काही वेळातच कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

शिवपुरी जिल्हा रुग्णालयात कोरोना वॉर्डमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणाला आग लागल्याने कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या रुग्णाजवळ त्याचा मुलगा होता. त्याच्या डोळ्यासमोरच सर्व घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मोहम्मद इस्लाम नावाच्या 60 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना वॉर्डात उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत होता. रुग्णाची प्रकृती स्थिर होती. त्याचवेळी घडलेली दुर्घटना त्यांच्या जीवावर बेतली आहे.

रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणाला अचानक आग लागली. त्यामुळे तिथे असलेल्या रुग्णाच्या मुलाने ऑक्सिजनची नळी हटवली. वडील असलेल्या बेडला आग लागू नये म्हणून त्याने वडिलांनाही बाजूला केले. ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने आणि बेडवरून बाजूला करण्यात आल्याने मोहम्मद यांचा थोड्याच वेळात मृत्यू झाला. वडिलांना बाजूला केले नसते तर त्यांचा होरपळून मृत्यू झाला असता कारण ते असलेला बेडही अर्ध्यापेक्षा जास्त जळाल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणाला अचानक आग कशी लागली, असा सवाल उपस्थित होत आहे. रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे एका कोरोनाबाधिताचा बळी गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या