
सामना ऑनलाईन । फुकेत
थायलंडमधील प्रसिद्ध फुकेत बेटावरील माय खो बीचवर सेल्फी घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या बीचवर सेल्फी घेतल्यास फाशीची शिक्षा होऊ शकते असे जाहीर करण्यात आले आहे.
फुकेत बेटावरील या समुद्र किनाऱ्याला लागूनच एक छोटे विमानतळ आहे. या विमानतळावरून सतत विमानांचे उड्डाण होत असते. ती विमान समुद्र किनाऱ्यावरून फार कमी अंतरावर आकाशात असतात. त्यामुळे या बीचवरील पर्यटक विमानांसोबत फोटो काढत असतात. अशा सेल्फींमुळे वैमानिकाचे लक्ष भटकू शकते व त्यामुळे विमानाचा अपघात होऊ शकते. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने बीचवरील पर्यटकांना सेल्फी घेण्यास बंदी घातली आहे. जर कुणी सेल्फी घेताना आढळला तर त्याला तत्काळ अटक होऊन त्याला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते असे जाहीर करण्यात आले आहे.































































