अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिचा खून केल्या प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बरेली मधील ही घटना असून पोस्को कोर्टाने हा निकाल दिला आहे.

29 जानेवारी 2016 रोजी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत शेतावर कामासाठी गेली होती. तिची आई नंतर घरी गेली. परंतु मुलगी शेतात काम करत होती. तेव्हा मुरारी लाल आणि उमाकांत गंगवार या दोन नराधमांनी तिला उचलले आणि एका अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा खून केला. या प्रकरणी दोघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.