
सामना ऑनलाईन । मुंबई
अवघ्या आठवड्याभरावर होळी येऊन ठेपली आहे. अभद्र, वाईट भस्मसात होऊ दे आणि नवीन रंगांची उधळण होऊ दे हे सांगणाऱ्या या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, ‘गिले शिकवे भूलकर दुश्मनभी गले मिल जातें है’, असं म्हणत सामाजिक ऐक्याची शिकवण होळीचा सण देतो. पण, याच होळीवर आधारित एका जाहिरातीवरून सध्या सोशल मीडियावर चांगलंच वादंग उठलं आहे.
दाग अच्छें है अशा टॅगलाईनखाली जाहिरात करणाऱ्या सर्फ एक्सेल या डिटर्जंट पावडरची एक नवीन जाहिरात नुकतीच व्हायरल झाली. होळीच्या दिवशी एक हिंदू मुलगी स्वतः संपूर्ण रंगते पण तिच्या मुस्लीम मित्राला रंगांपासून वाचवत मशिदीपर्यंत घेऊन जाते, असं या जाहिरातीत दाखवण्यात आलं आहे. ‘अपनेपन के रंग से औरों को रंगने में दाग लग जाएं तो दाग अच्छे हैं.’ अशा वाक्यावर ही जाहिरात संपते. सणांच्या माध्यमातून सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश या वाक्यातून देण्यात आला आहे.
One of the worst Ad ever by Surf Excel. It should be rolled back and @HUL_News should apologize for hurting sentiment of our religion.#BoycottSurfExcel
— Krishna Kumar (@raj_imkrishna) March 11, 2019
Surfexcel has made a plan for Hindu girls to be victimized by #LoveJihad by Muslims #BoycottSurfExcel
— Chittan hindu (@chittaranjande7) March 11, 2019
मात्र, ट्विटरवर या जाहिरातीवर टीका होताना दिसत आहे. ‘नेहमी जाहिरातीत हिंदू सणांनाच का लक्ष्य केलं जातं?, अशी जाहिरात ही लव्ह जिहादला खतपाणी घालणारी आहे, अशा प्रकारे तुम्ही इतर धर्मांचे सण का दाखवत नाही, होळीला उडवलेले पवित्र रंग हे डाग कसे काय? अशी विचारणा करणाऱ्या प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर उमटत आहेत. त्यामुळे सर्फ एक्सेल या उत्पादनावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. boycottsurfexcel अशा हॅशटॅगखाली अनेक नेटकऱ्यांनी या जाहिरातीवर संताप व्यक्त केला आहे.
पाहा व्हिडीओ-



























































