‘डेक्कन क्वीन’ला 22 जूनपासून एलएचबी डब्यांचा साज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई ते पुणे या दोन महानगरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला येत्या 22 जूनपासून अत्याधुनिक एलएचबी तंत्रज्ञानाचे डबे जोडण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या पहिल्या सुपरफास्ट गाडीचे वैशिष्टय़ असलेली ‘डायनिंग कार’लाही एलएचबीचे स्वरूप देण्यात आल्याने ही गाडी नव्या साजात सज्ज होत आहे.

‘डेक्कन क्वीन’ला निळय़ा व पांढऱ्या रंगाऐवजी नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. गाडीचे डबे एलएचबी स्वरूपात तयार करण्याचे शिवधनुष्य चेन्नईच्या आयसीएफ कारखान्याने सहज पेलले. त्यामुळे आता 22 जूनपासून डेक्कन क्वीनला 17 ऐवजी 16 डबे जोडले जाणार असून त्यात ‘विस्टाडोम’ कोचचाही समावेश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.