
सामना प्रतिनिधी । नगर
लोकसभा निवडणुकीसाठी नगरच्या जागेवरुन आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यानंतर भाजप उमेदवारी जाहीर केल्यानंतरच राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करावा अशी मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे पदाधिकार्यांच्या झालेल्या बैठकीत वेगेवगळी मत मतांतरे आल्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी बुचकळ्यात सापडल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
नगर जिल्हयामध्ये सध्या लोकसभेच्या वातावरणामध्ये काँग्रेस आघाडीत चांगलेच धुमशान सुरु झाले आहे. राष्ट्रवादीने नगरची जागा न सोडण्याचा निर्णय घेल्यावर अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत, त्यातच सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमध्ये उभी पुट पडल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी दोन दिवस मुंबई येथे बैठक पार पडली या बैठकीत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुध्दा सध्याच्या घडामोडीवर होताना दिसत आहे. परंतु अद्यापही आघाडीचा उमेदवार निश्चित नसल्याने सर्वत्र चलबिचल सुरु असून आघडीत विखे यांच्या प्रवेशाने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सुजय विखे यांनी भाजपावर केलेल्या जुन्या क्लिप व्हारल करुन एक प्रकारे विखेंना खिडीत पकडण्याचा डाव आणत आहे. सध्या लोकसभेची निवडणुक चांगलीच वाजत असल्याने यानंतर आणखी काय काय जिल्ह्यात घडणार आणि आघाडी आणि युतीचे अंतिम तिकीट कोणला निश्चित होणार यावरच चर्चा सुरु आहेत. परंतु अधिकृत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत प्रचारापेक्षा अपप्रचारालाच जास्त ऊत आला असून, वारंवार माध्यमांद्वारे उमेदवारांची खिल्ली उडवली जात आहे.
मुंबई येथे झाल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतंत्र मते आजमावून घेतली आहेत. त्यामध्येच बहुधा एकवाक्यता न आल्याने उमेदवारी द्यायची कोणाला असा प्रश्न आता श्रेष्ठींपुढेच पडला आहे अशी चर्चा सध्या राष्ट्रवादी जोर धरु लागली आहे. भाजपने अद्याप उमेदवारी जाहीर न केल्याने नगरच्या जागेवर आपण त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर करायची का असाही सूर आता आळवला जात आहे. एकंदरीच नगरच्या जागेवरुन श्रेष्ठीच बुचकळ्यात पडल्यामुळे किती दिवस चर्चेचे गुन्हा चालू ठेवायचे असा विषय सध्या आघाडीत चर्चिला जात आहे.

























































