
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
सीबीआयच्या सगळ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत तपास यंत्रणेची अब्रू घालवल्यानंतर मोदी सरकार जागं झालं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचं सांगत, केंद्रीय दक्षता आयोग या अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपींची चौकशी करेल असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं आहे. सीबीआय हे स्वायत्त तपास यंत्रणा असल्याने सरकार त्यांची चौकशी करू शकत नाही असंही ते म्हणाले.
अरुण जेटली यांची पत्रकार परिषद पाहण्यासाठी हा व्हिडीओ प्ले करा
सीबीआय ही देशातील प्रतिष्ठीत तपास यंत्रणा आहे. जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे ती अत्यंत विचित्र आणि दुर्भाग्यपूर्ण असल्याचं जेटली म्हणाले. या परिस्थितीचा फायदा सीबीआय तपास करत असलेल्या आणि विदेशात जाऊन लपलेल्या आरोपींना होऊ शकतो, आणि ते सीबीआयवर भलत्यासलत्या शंका उपस्थित करू शकतात. असं होऊ नये यासाठी तातडीने केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून, दोन्ही अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं असल्याचं जेटली म्हणाले.



























































