दीपक कोचर 19 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीतच राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीआयसीआय बँक-व्हिडीओकॉन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दीपक कोचर यांची रवानगी 19 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीत करण्यात आली आहे. आयसीआयसीआयच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी ईडीने अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत ईडी कोठडीची शिक्षा सुनावली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना ईडीने सोमवारी अटक केली. आयसीआसीआय बँक -व्हिडीओकॉन केस प्रकरणात ही कारवाई ईडीने केली. आर्थिक गैरव्यवहार आर्थिक गैरक्यकहार आणि भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. व्हिडीओकॉनला दिलेल्या कर्ज प्रकरणात चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता आणि त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून दिला होता असा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीने याआधीच दीपक कोचर व चंदा कोचर यांची महाराष्ट्र आणि तामिळनाडूतील 78.15 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

काय आहे प्रकरण
चंदा कोचर यांच्यावर त्यांच्या पतीला म्हणजेच दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरवापर केलाया आरोप आहे. ‘आयसीआयसीआय’ने व्हिडीओकॉन समूहाला 1 हजार 875 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडीओकॉन ग्रुपने कर्जाच्या 86 टक्के रक्कम चुककली नक्हती. 2017 मध्ये हे कर्ज थकीत खात्यात (एनपीए)मध्ये टाकण्यात आले होते. त्यानंतर ईडीने मनी लॉण्डरिंग कायद्यांतर्गत दीपक आणि चंदा कोचर यांच्याकिरुद्ध गुन्हा दाखल करीत त्यांच्या मालमत्तेकर टाच आणली होती.