एवढी आहे दीपिकाच्या बॅगवतीची किंमत… ऐकून थक्क व्हाल !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचे सुपरस्टार आणि त्यांची लाईफस्टाईल याबद्दल अनेकदा चर्चा होत असते.बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत धडक मारणारी दीपिका सध्या सुट्टीवर आहे. सुट्टीसाठी विदेशात रवाना होताना दीपिका मुंबईच्या विमानतळावर दिसली होती. तेव्हा तिच्या बॅगची प्रचंड चर्चा झाली. दीपिकाची ही बॅग अनेकदा प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दीपिकाकडे असलेल्या एका आंतरराष्ट्रीय ब्रॅडच्या अत्यंत महागड्या बॅगची किंमत २,९०,७४९.७८ म्हणजेच २.९ लाख इतकी आहे. असं सांगितलं जात आहे की, या बॅगच्या किंमतीची तुलना जर युरोपशी केली तर १० दिवसांत युरोप फिरता येईल.तसंच युरोपातील ३-स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व फिरण्याची उत्तम सोय होऊ शकते. याआधी ही दीपिकाने घातलेल्या महागड्या जॅकेट व टी-शर्टच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या.