
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
गोव्यातील एका महिला काँग्रेस कार्यकर्तीने भाजप नेते सुभाष शिरोडकर यांच्या समर्थकांवर गँगरेप करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिया शेटकर असे या महिलेचे नाव असून त्या प्रदेश महिला काँग्रेसची राज्य सचिव आहेत. पेशाने त्या वकील आहे.
शिरोडकर यांच्या लोकसभा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी गेल्याने रविवारी मला त्यांच्या समर्थकाने फोनवरून गँगरेपची धमकी दिली, असे शेटकर यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच शिरोडकर यांच्या मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न केलात किंवा त्यांच्याविरोधात प्रचार केला तर जीवे मारू, अशी धमकीही संबंधित व्यक्तीने दिल्याचे शेटकर यांनी म्हटले आहे.
एका महिलेचा छळ करण्यासाठी शिरोडकर यांचे सर्मथक इतक्या खालच्या पातळीवर आले आहेत की ते मला गँगरेपची धमकी देत आहेत. म्हणूनच याप्रकरणी मी पणजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याचा तपास करावा असा आग्रह धरला आहे. हा प्रकार चिंताजनक आहे. लोकशाही असलेल्या देशात महिलेचा सन्मान व्हायला हवा असे शेटकर यांनी म्हटले आहे. याआधीही शिरोडकर यांच्याविरोधात तक्रार केल्याच शेटकर यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यात शिरोडकर यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याबरोबर माजी आमदार दयानंद सोपटे हे देखील भाजपात सहभागी झाले होते.
Goa Pradesh Mahila Congress state secretary Diya Shetkar accused Bharatiya Janata Party leader Subhash Shirodkar’s supporters of threatening her with gangrape if she campaigned against him in his constituency
Read @ANI Story | https://t.co/jkiGvBHpJF pic.twitter.com/reFtD0m2d2
— ANI Digital (@ani_digital) November 4, 2018

























































