विनोद तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा – केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर बुधवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली. दिल्लीवासीयांनो, महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद करणारे विनोद तावडे यांना दिल्लीतील सुंदर आणि शानदार शाळा दाखवा. छोले भटूरे खाऊ घाला, दिल्ली दर्शन घडवा. कारण ते आपले पाहुणे आहेत, अशा बोचऱया शब्दांत केजरीवालांनी ट्विटद्वारे विनोद तावडेंना टोले लगावले. भाजपने तावडेंवर दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे.