
अदानी एंटरप्रायसेस लिमिटेडला दिल्लीच्या एका न्यायालयाने मोठा दिलासा दिला. अदानी एंटरप्रायझेसविरोधात माध्यमांना बदनामीकारक मजकूर प्रकाशित व प्रसारित करण्यास न्यायालयाने बंदी घातली. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश धिरज कुमार सिंग यांनी अदानी एंंटरप्रायझेसने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर सुनावणी करताना प्रतिवादी माध्यमांच्या वेबसाईट आणि सोशल मीडिया साईटवरून कंपनीविरोधातील मजकूर हटविण्याचे आदेश दिले.