
दिल्लीतील दारू धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयानं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कोठडी शुक्रवार, 13 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे.
आप नेत्याला 4 ऑक्टोबर रोजी सक्तवसुली संचालनालयानं अटक केली होती. त्यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली होती. सिंग हे या प्रकरणात अटक झालेले तिसरे आप नेते आहेत.
गेल्या आठवड्यात EDनं दिलेल्या 5 दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर सिंग यांना आज राऊस अव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
ED आणि CBIनं नोंदवलेल्या खटल्यांमध्ये न्यायमूर्तींनी यापूर्वी आपचे इतर नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना जामीन नाकारला आहे. या दोघांनाही दिल्ली उच्च न्यायालयानं दोन्ही एफआयआरमध्ये जामीन नाकारला आहे.
न्यायालयात हजर होताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधू नका; संजय सिंह यांना न्यायालयाचे निर्देश

























































