
दिल्लीत कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गाझियाबाद आणि नोयडामध्ये लिफ्टमध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमुळे हा चिंतेचा विषय झाला आहे. लोकांनी कुत्रा पाळण्याबाबत संताप व्यक्त केल्यानंतर कुत्रा पाळण्याचे आता कठोर नियम करण्यात आले आहेत. दिल्लीत दरदिवशी 100 ते 150 लोकांना कुत्रा चावतो. त्यामुळे जाणून घेऊया कुत्रा पाळण्याच्या लायसन्स बाबतचे, नियम.
दिल्लीत 20 हजारांहून अधिक कुत्रे लोकांसाठी त्रासदायक ठरले आहेत. यामध्ये पाळीव कुत्र्यांव्यतिरिक्त भटक्या कुत्र्यांचाही सहभाग आहे. निगमच्या पशु चिकित्सा विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे की, निगच्या रुग्णालयात दरदिवशी 100 ते 150 लोक कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी येत असतात. मात्र रुग्णालयात रेबीजचे इंजेक्शन सर्वांनाच नाही मिळत.
कुत्रा पाळण्याचे नियम
– दिल्ली नगर नियम अधिनियम 1957च्या 399 कलमानुसार प्रत्येक मालकाला कुत्र्याचा परवाना काढणे बंधनकारक आहे.
– दिल्ली नगर निगमच्या पोर्टलवर जाऊन कोणीही व्यक्ती कुत्र्याचा परवाना काढू शकते. त्याची 500 रुपये परवाना काढण्याची फी आहे.
– परवाना न काढल्यास निगम सार्वजनिक स्थळी फिरणाऱ्या पाळीव कुत्र्यावर कारवाई करु शकते.
कुत्र्याला मारु शकतात
पशु चिकित्सा विभागाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर एखादा कुत्रा अनेकदा लोकांना चावला असेल तर त्याचा रेकॉर्ड तयार करुन त्याला मारले जाऊ शकते.
या जातीचे कुत्रे
– जर्मन शेफर्ड
– ग्रेट डेन
– बॉक्सर
– लेब्राडोर
– रॉडबिलर पग
– गोल्डन रिटरीवर
पाळण्यासाठी योग्य वातावणाची गरज
कोणत्याही प्राण्याला पाळण्यासाठी योग्य वातावरणाची गरज असते. पहाडी कुत्र्यांना दिल्ली किंवा लखनऊ सारख्या शहरात पाळण्यासाठी योग्य वातावरणाची गरज असते. दिल्लीसह देशभऱात पर्यावरण आणि प्राण्यांसाठी सिटीझन फॉर द वेलफेअर अॅण्ड प्रोटेक्शन ऑफ अॅनिमल्सच्या संस्थापक सोन्या घोष यांनी सांगितले की. देशभरात कुत्र्यांची अवैधरित्या ब्रिडींग केली जाते.त्यामुळे त्यांच्या डीएनएमध्ये बदल झालेला आहे. लोकं कुत्र्यांना पाळतात आणि त्यांना पिंजऱ्यात बंद करतात, त्यामुळे त्यांचा स्वभाव बदलतो.


























































