#CoronaCrisis – ‘तुम्ही डोळे झाकपणा करू शकता, आम्ही नाही’, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावलं

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. अशातच अनेक रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. यावरूनच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकाराला खडेबोल सुनावले आहेत. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ‘तुम्ही डोळे झाकपणा करू शकता, मात्र आम्ही नाही.’

उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, याक्षणी महाराष्ट्रात ऑक्सिजनचा वापर कमी झाला आहे, तर काही टॅंकर दिल्लीला तिथून पाठवले जाऊ शकतात. केंद्र सरकारनी आपली भूमिका मांडत न्यायालयात म्हटले की, ‘आम्ही अनुपालन अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात दाखल करीत आहोत.’

दिल्ली उच्च न्यायालयाने सुचवले आहे की, काही ठिकाणी ऑक्सिजन स्टोअर करून ठेवता येईल. ज्यामुळे ऑक्सिजन कमतरतेच संकट कमी होईल. तसेच न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला 700MT ऑक्सिजन देण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत त्यांना इतके मिळवलेच पाहिजे. दरम्यान, दिल्ली सरकराने केंद्र सरकारवर ऑक्सिजन पुरवठा न करण्याचा आरोप केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या