राम मंदिराच्या वर्गणीवरून हत्या झाल्याचा भावाचा आरोप, पोलीस म्हणतात बर्थडे पार्टीत वाद; तपास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीच्या मंगोलपुरी येथे वाढदिवसाच्या पार्टीमध्ये एका तरुणाची चाकूने हत्या करण्यात आली आहे. सांगण्यात येत आहे की, रिंकू शर्माचा त्याच्या मित्राशी काही कारणावरून वाद झाले. यानंतर रिंकूच्या मित्राने आपल्या तीन मित्रांना बोलवून त्याची हत्या केली. पोलिसांनी चौघाही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान रिंकूच्या भावाने आरोप केला आहे की, राम मंदिरासाठीच्या वर्गणीवरून हा वाद झाला असून त्यातूनच हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.

पीडित व्यक्तीची ओळख रिंकू शर्माच्या रूपात करण्यात आली आहे. तो एका खासगी रुग्णालयात टेकनेशिअन म्हणून कार्यरत होता आणि आपल्या परिवारासोबत मंगोलपुरी येथे तो राहत होता. पोलीसने आरोपींची ओळख केली असून मोहम्मद दानिश, मोहम्मद इस्लाम, जाहिद और मोहम्मद मेहताब अशी त्यांची नावे आहेत. दानिश आणि इस्लाम शिंपी आहेत, जाहिद एका कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि मेहताब 12 वी इयत्तेत शिकतो.

पोलिसांच्या माहितीनुसार, दानिश आणि रिंकू यांच्यात बर्थडे पार्टीत चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 11 वाजता रिंकू बर्थडे पार्टीतून परत जाण्यास निघाला तेव्हा दानिशने त्याला रोखले. या दरम्यान रिंकूने दानिशला कानशिलात मारली, मग दानिश आणि त्याच्या तीन मित्रांनी रिंकूवर चाकूने वार केला. चारही आरोपी रिंकूला रक्ताच्या थारोळ्यात तसेच सोडून पळाले.

रिंकूला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. अतिरिक्त पोलीस उपायुक्त सुधांशु धामा यांनी सांगितेल की, प्राथमिक तपासा दराम्यान, दानिश आणि त्याच्या मित्रांची ओळख पटवण्यात आली असून धाडी टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे.

एसीपी सुधांशु धामा यांनी सांगितले की, रिंकू आणि दानिश एकाच भागात राहतात आणि एकमेकांना ओळखत होते. वैद्यकीय तपासातून समजले की रिंकूच्या पोटात एक घाव होता आणि प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सर्व 4 जणांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींवर या आधी कोणतेही आरोप नाहीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजप आणि विश्व हिंदू परिषदने आरोप केला आहे की ही हत्या राम मंदिर निर्माणावरूनच ही हत्या झाली आहे. तसेच निधर्मी लोक अजून गप्प का? असा सवाल करण्यात आला आहे.