दिल्ली विद्यापीठात वीर सावरकरांच्या पुतळ्याचा अवमान, देशभक्तांमध्ये संतापाची लाट

990

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकार यांच्या पुतळ्याचा अवमान करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या उत्तरेकडील कॅम्पसमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप)  सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांचे पुतळे उभारले होते. यास विरोध दर्शवण्यासाठी नॅशनल स्टुडंट (एनएसयूआय)च्या नेत्यांनी सावरकर यांच्या पुतळ्याला बुधवारी रात्री चपलांचा हार घातला व काळे फासले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अभाविपच्या विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुतळा स्वच्छ केला. त्यानंतर काही वेळासाठी विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इंडिया टुडेच्या वेबसाईटने यासंदर्भात एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे यासंदर्भात चौकशी केली असता विद्यापीठाच्या परवानगी शिवाय मंगळवारी सकाळी उत्तरेकडील कॅम्पसमध्ये वीर सावरकार, सुभाषचंद्र बोस आणि भगत सिंग यांचे पुतळे अभाविपने उभारले, असा आरोप एनएसयूआयकडून करण्यात आल्याचे दिल्ली विद्यापीठाचे अध्यक्ष शक्ती सिंग यांनी असे आहे. तर देशासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आवश्यक ती परवानगी मागण्यासाठी अनेकवेळा विद्यापीठ प्रशासनाकडे गेलो. पण त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. आम्ही अनेक पत्रेही प्रशासनाला लिहिली आहेत. तसेच कुलगुरूंचीही अनेकवेळा भेट घेतली. पण त्याची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. अखेर नाईलाजाने आम्ही पुतळे उभे केले. या महापुरुषांच्या पुतळ्यांमुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळेल या आशेने हे पुतळे उभारण्यात आले होते, असे ही शक्ती सिंग यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या