पश्चिम बंगालची परिस्थिती आणीबाणीपेक्षा कमी नाही -जावडेकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रकाश जावडेकर – माहिती प्रसारण, पर्यावरण मंत्री

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देश गेल्या पाच वर्षांत ’अत्यंत आणीबाणी’च्या (सुपर इमर्जन्सी) परिस्थितीतून गेला आहे, असे वादग्रस्त ट्विट करणाऱया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मंगळवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. पश्चिम बंगालची परिस्थिती आणीबाणीपेक्षा कमी नाही, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ती पद्धत आणीबाणीसारखीच आहे. ममता अत्यंत वाईट पद्धतीने राज्य चालवत आहेत. भाजपचा लोकशाहीवर विश्वास आहे व तिचे संरक्षण करण्यास आमचा पक्ष कटिबद्ध आहे, अशा शब्दांत प्रकाश जावडेकर यांनी ममता बॅनर्जी यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. 1975 च्या आणीबाणीदरम्यान देशाला आम्ही वाचवले आणि आता पश्चिम बंगालमध्येसुद्धा लढा देऊ, असेही ते म्हणाले.